करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव उत्तर येथे जागेच्या कारणावरून मारहाण झाली आहे. यामध्ये तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मल्हारी विष्णू भांडवलकर, विष्णू भांडवलकर व बाळासाहेब विष्णू भांडवलकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यामध्ये अभिजित प्रवीण भांडवलकर (वय १९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत अभिजित भांडवलकर यांचे आई- वडील बांधकामावर काम करत होते. तेव्हा गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी तेथे आला व तू आमच्या जागेत बांधकाम का करतो असे म्हणून मारहाण केली. यामध्ये कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वडगाव येथे जागेच्या कारणावरून मारहाण
