Bhagwat Gyan Yagya ceremony to be held in Karmala on 21 December

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील संत गजानन महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त २१ ते २७ डिसेंबरला श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा होणार आहे. भागवताचार्य अनुराधा दीदी यांच्या वाणीमध्ये हा सोहळा होणार आहे. करमाळा शहर व तालुक्यातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यजमान श्रेणीकशेठ खाटेर यांनी केले आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा होत आहे, असे संत गजानन महाराज मंदिराच्या कुरुलकर यांनी सांगितले.

श्रेणिकशेठ खाटेर यांनी ‌यजमान पद घेतल्याबद्दल नियोजन बैठकीत संत गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कुरुलकर, प्रदीप देवी, जगदीश शिगची, विजयराव देशपांडे, रवींद्र विद्वत, देविदास, नष्टे, संजय तनपुरे, शशिकांत कुलकर्णी, नितीश देवी, माजी नगरसेविका संगिता खाटेर, मनिषा मसलेकर, सूनिता चिवटे, प्रभावती चिवटे, छाया सोरटे, शोभा पुराणिक, मंगल पुराणिक, वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *