कोंढेज, सौंदे व झरे येथे चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

Bhoomipujan of various development works by Ganesh Chivte at Kondhez Saunde and Zare

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोंढेज, सौंदे व झरे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते हे भूमिपूजन झाले. तर सौंदे येथे बाळनाथ मंदिर परिसरात सभामंडपाचे लोकार्पण झाले. झरे येथे चौधरी वस्ती व बागल वस्ती येथे रस्त्यासाठी 15 लाख निधी दिला आहे. या कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांनी करमाळा तालुक्यात आठ कोटीची विकास कामे आणली आहेत. झरे येथे झालेल्या कार्यक्रमावेळी किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष झरे ग्रामपंचायतचे सदस्य सोमनाथ घाडगे, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, दहिगावचे उपसरपंच लक्ष्मण शेंडगे, पोफळजचे उपसरपंच बिभीषण गव्हाणे, पोथरेचे माजी सरपंच सरपंच विष्णू रंदवे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक धर्मराज नाळे, नितीन कानगुडे, हर्षद गाडे, भैयाराज गोसावी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *