करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील व उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वच्छता अभियानाअंतर्गत एनसीसीकडून करमाळा शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. ‘स्वच्छता हिच देश सेवा’ उपक्रमांतर्गत ‘एक तारीख एक तास स्वच्छता’ उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सीटीओ निलेश भुसारे व सर्व कॅडेट उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व 9 महाराष्ट्र बटालियन सोलापूर यांच्या वतीने ही रॅली काढण्यात आली.

