करमाळा (सोलापूर) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहचे अधीक्षक सुभाष भोसले यांना पुणे विभागाचा 2025 चा उत्कृष्ट गृहपाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. सातारा येथे पुणे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे विभागातील समाज कल्याण विभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या पुरस्काराबद्दल सोलापूर समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक सुलोचना सोनवणे, कार्यालय अधीक्षक शांताराम शिंदे, सोलापूर समाज कल्याणचे निरीक्षक विठ्ठल धसाडे यांनी भोसले यांना शुभेच्छा दिल्या. करमाळ्याच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अनेक विभागात आपला नावलौकिक केलेला असून वसतिगृहाचे नाव भोसले यांच्या मार्गदशनाखाली उंचावले असून या माजी विद्यार्थ्यांमधून देखील भोसले यांचे कौतुक होत आहे.