करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य कला संचनालयामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत गुरुकुल पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल १०० लागला असून या परीक्षेसाठी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक नितीन भोगे व सचिवा रेश्मा भोगे यांनी केले आहे.

इंटरमिजिएट परीक्षेत ऋतुजा राऊत या विद्यार्थिनीने A ग्रेड मिळवून यश संपादन केले तर जानव्ही मुसळे, वैष्णवी सावंत, वेदिका शिंदे, मृणाल थोरात, अथर्व अवताडे, निरज बागल, यश काळे, ऋषिकेश दुधे, आकाश फुके, विशाल वीर, पृथ्वीराज जगताप, समर्थ देशमुख, अथर्व सपकाळ, ओम जाधव या विद्यार्थ्यांनी B ग्रेड मिळवली. यशराज लावंड, समीरा मुलाणी, समृद्धी बदर, श्रोतम भोसले, आर्यन माने, देवेंद्र नायक या विद्यार्थ्यांना C ग्रेड मिळवून घवघवीत यश संपादन केले. या विदयार्थ्यांना कलाशिक्षक सारिका शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
