करमाळा (सोलापूर) : डॉ. आंबेडकरवादी चळवळच्या वतीने आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सिद्धार्थ स्पोर्टस् क्लब व डॉ. आंबेडकरवादी चळवळ करमाळा यांच्याकडून लेझीम खेळुन मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सचिन काळे, संदिप रोडगे, वैभव वीर, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे सदस्य सचिन गायकवाड या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. डॉ. आंबेडकरवादी चळवळ करमाळा यांच्या कडून त्यांचा सत्कार करण्यात आला.



