Restrictions on Ujnit Mangur fishery Warning of filing a case if fishing without a license

सोलापूर : उजनी जलाशयात मांगूर मत्स्यपालनावर प्रतिबंधित निर्बंध घालण्यात आले आहेत. मांगूर मत्स्यपालन करणाऱ्या मत्स्य व्यवसायिक यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारा मांगुर मासा त्वरित नष्ट करून उजनी संपादित क्षेत्रात असणारी शेततळी देखील नष्ट करण्यात यावीत, अन्यथा अशा प्रकारचा कोणताही गैरप्रकार उजनी संपादित क्षेत्रात आढळून आल्यास संबंधितावर विविध कलमाव्दारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. (Restrictions on Ujnit Mangur fishery Warning of filing a case if fishing without a license)

उजनी जलाशयात मासेमारी करणारे पूणे, सोलापूर व अहमदनगर जिल्हयातील दौंड, इंदापूर, माढा, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यातील स्थानिक परवानाधारक मत्स्यव्यवसायीक/ विनपरवाना अनधिकृत मासेमारी करणारे सर्व सबंधीत सर्व सबंधित मत्स्यव्यवसायिक यांना हा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 28 नोव्हेंबरला जलसंपदा विभाग, पोलिस विभाग, महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आण‍ि स्थानिक मच्छीमार संघटना प्रतिनिधी यांची बैठक झाली. यावेळी हा इशारा देण्यात आला आहे.

उजनी जलाशयात लहान मासळीच्या अनधिकृतपणे विनापरवाना मासेमारी करणाऱ्या संबंधीत मच्छीमारांवर तसेच जलाशयाच्या सभोवताली उजनी संपादीत क्षेत्रात प्रतिबंधित मांगुर मत्स्यपालनावर सर्व संबंधित विभागांनी कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशा सुचना यावेळी देण्यात आल्या आहेत. स्थानिक मत्स्य व्यवसाय करणारे मच्छिमार यांनी जनसंपदा विभागाकडून अधिकृतपणे उजनी जलाशयात मासेमारी करण्याचा परवाना घेतलेला नाही, अशा सर्व स्थानिक मच्छिमार यांनी नजीकच्या जलसंपदा विभागाच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ते शासकीय शुल्क भरून त्वरीत परवाना प्राप्त करून घ्यावा. अन्यथा विनापरवाना जलाशयात प्रवेश केला म्हणून देखील कारवाई करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर यांनी परिपत्रकाव्दारे सांगितले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *