करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपकडून जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी विद्यानगर येथील भाजपा कार्यालयात संपर्क साधून अर्ज सादर करावा, असे आवाहन भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी प्रसीध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
करमाळा नगरपालिकेची निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढवणार आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी विद्यानगर येथील भाजपा कार्यालयाशी संपर्क करून आपण आपले इच्छुक असल्याबाबतचे विहित नमुन्यातील अर्ज सकाळी 11 ते 5 या वेळेत सादर करावा. इच्छुक उमेदवारांच्या संदर्भातील निर्णय पक्षपातळीवर घेतला जाईल. करमाळा शहर हे परिवर्तनासाठी सज्ज असून या निवडणुकीमध्ये निश्चितपणे भाजपला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
