करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या प्रभाग ३ मध्ये भाजपच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांसाठी काल (बुधवार) सांयकाळी प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रभागात नगराध्यक्षपदासाठी सुनीता देवी, नगरसेवकपदासाठी जगदीश अगरवाल व श्रुती कांबळे उमेदवार आहेत.
या प्रचारफेरीत विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, भाजपचे गणेश चिवटे, कन्हैयालाल देवी, संजय शिलवंत यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांना करमाळा शहराच्या विकासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रभागातील प्रत्येक गल्लीत जाऊन त्यांनी नागरिकांशी सवांद साधला. सुभाष चौक, जय महाराष्ट्र चौक, फुलसौन्दर चौक, वेताळ पेठ, राम मंदिर, खडकपुरा येथील गणेश मंदिर, कुंकू गल्ली, मेन रोड, खाटीक गल्ली मार्गे येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर रॅलीचा समारोप करण्यात आला.
