करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र परीक्षा परिषदच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुरुकुल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये प्रशालेचे 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. यामध्ये पाचवीतील संचिता माने, शरयू बिरंगळ, शार्दूल कुलकर्णी, स्वरा गपाट, आदिराज घाडगे व चैतन्य ढिसले. आठवीतील सुजल दौडे, अथर्व राठोड, संस्कृती जाधव व सोहम थोरात हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक नायकुडे व भगत यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भोगे व संचालिका रेश्मा भोगे यांनी अभिनंदन केले.

