करमाळ्यातील नव्याने सुरु झालेल्या सिनेमागृहाला भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली भेट

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात नव्याने सुरु झालेल्या सिनेमागृहाला भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली. करमाळ्यातील सिने रसिक प्रेक्षकांची गरज ओळखून निखिल चांदगुडे यांनी सिनेमागृह सुरु केले आहे. याची पहाणी करून मोहिते पाटील यांनी कौतुक केले आहे. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविताराजे राजेभोसले, श्याम सिंधी व संतोष सोरटे, आदित्य जाधव, गणेश कारंडे, भैय्या बर्डे, संदीप ढाकरे, महारुद्र बाबर, ऍड. शशिकांत नरूटे, प्रा. दर्गुडे, कपिल मंडलिक आदी उपस्थित होते. चांदगुडे यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले.
तरटगाव येथे भाजपचे मोहिते पाटील व माजी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. घाडगे यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *