Dr Kavita Kamble announced Karmala Sangeet Rasik award The distribution will be held at the Sur Sudha festival in Karmala on Saturday

करमाळा (सोलापूर) : सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने शनिवारी (ता. 6) सायंकाळी 5 वाजता गुरुप्रसाद मंगल कार्यालय येथे ‘सुर सुधा’ महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे हे उपस्थित राहणार आहेत. यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सेवानिवृत्त सहसंचालक दत्तात्रय देवळे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी दिली आहे.

या महोत्सवामध्ये विविध राज्यातून कलाकार गायन व नृत्य सादरीकरण आहेत. संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व आलेल्या कलाकारांचा यावेळी सन्मान होणार आहे. करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील व नांदेड येथील पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने यांना यावेळी बा. सं. नरारे महाराज जीवन गौरव पुरस्कार तर डॉ. कविता कांबळे यांना करमाळा संगीत रसिक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. कलाकारामध्ये कोलकत्ता येथील सरबानी सेन व गुवाहाटी येथील चित्रलेखा गोगोई यांना करमाळा नृत्यभूषण अवॉर्ड, इंदौर येथील डॉ. विधी नागर व मुंबई येथील डॉ. मयुरा आनंद खटावकर यांना करमाळा नृत्यभूषण अवॉर्ड, हैदराबाद येथील स्नेहा रामचंद्र व कोलकता येथील अर्पिता व्यंकटेश यांना नृत्य शिरोमणी अवार्ड, गुवाहाटी येथील काकली हजारिका व भुवनेश्वर येथील बनिता भांजा यांना नृत्यसम्राज्ञी अवार्ड तर गुवाहाटी येथील दीपिका बोरो यांना करमाळा नृत्य कला अवार्डने गौरविण्यात येणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *