करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने वेग घेतला असल्याचे चित्र आहे. आज दत्त पेठमध्ये भाजपची प्रचारसभा झाली. यावेळी उमेदवार सुनीता देवी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल हे उपस्थित होते. त्यामुळे ते सक्रिय झाल्याचे दिसले. भाजप नेत्या रश्मी बागल यांनी देखील घोलप यांच्या प्रचार संपर्क कार्यालयाच्या उदघाटनावेळी विकासाचाच मुद्द्यावर ही निवडणूक जिंकायची असल्याचे सांगितले. भाजपमध्ये किंगमेकर विलासराव घुमरे हे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र तेही सक्रिय झाल्याचे चित्र आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांनीही आज राष्ट्रवादीचे नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात असलेले उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात केली. तेव्हा नगराध्यक्षपदाला देवी यांनाच समर्थन असल्याचे सांगितले.
