Aishwarya Mhetre felicitated by former MLA Narayan Patil for being selected as MSEB Chemist

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत रसायन शास्त्रज्ञ वर्ग एक या पदावर निवड झाल्याबद्दल ऐश्वर्या म्हेत्रे यांचा माजी आमदार नारायण पाटील यांनी सत्कार केला आहे. जेऊर ग्रामपंचायत येथे हा सत्कार करण्यात आला. यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपअध्यक्ष अनिलकुमार गदिया, सचिव प्रा. अर्जुनराव सरक, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, ऐश्वर्याचे वडील करमाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मनोजकुमार म्हेत्रे, संगीता म्हेत्रे, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, ग्रामविकास अधिकारी अंगद माने, सूर्यकांत पाटील, नाना मोटे आदी उपस्थित होते. ऐश्वर्याने रसायन शास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून नेट सेट परीक्षा उत्तीर्ण आहे. सध्या ती नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये कार्यरत असून तिने पीएचडी प्राप्त केली आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *