करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडून विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरु आहे. आज (शुक्रवार) ३ कोटी २६ लाख २६ हजार ५०० रुपयांच्या कामांचे भूमीपूजन झाले आहे. यामध्ये सौन्दे येथे ६६ लाख ५० हजार व करमाळा शहरात तब्बल २ कोटी ६० लाखांच्या कामांचे भूमीपूजन झाले आहे.
करमाळा शहरात माजी सैनिक कल्याणकारी संस्था कारगील भवनसाठी २० लाख मंजूर झाले आहेत. याचे आज भूमिपूजन झाले. याशिवाय मौलालीमाळ दफनभूमी पाणीपुरवठा करणे, लादीकरण, संरक्षक भिंत बांधणे व इतर सुविधांसाठी २० लाख मंजूर झाले असून त्याचे भूमिपूजन करण्यात आले. सिद्धार्थनगर येथील ख्रिश्चनभूमी येथे प्रार्थना मंदिर बांधणे, पाणी पुरवठा करणे व पेव्हिंग ब्लॉक बसवणे यासाठी २० लाख मंजूर असून त्याचेही भूमिपूजन झाले. राज्य सरकारच्या पुरातत्व विभाग अंतर्गत करमाळा भुईकोट किल्ला जतन व दुरुस्तीसाठी २ कोटी मंजूर असून त्याचेही उदघाटन झाले.
सौन्दे येथे आमदार स्थानिक विकास निधीमधून एसटी सॅन्डसाठी ३ लाख ५० हजार मंजूर झाले असून त्याचे भूमीपूजन झाले. सौन्दे ते सरफडोह रस्त्यासाठी २० लाख मंजूर असून त्याचे भूमीपूजन झाले. जिल्हा परिषद शाळा खोली बांधण्यासाठी ११ लाख मंजूर असून त्याचे भूमीपूजन करण्यात आले. वडार समाज मंडूर दुरुस्तीसाठी ५ लाख मंजूर असून त्याचे भूमीपूजन झाले. पेव्हिंगब्लॉक बसविण्यासाठी ७ लाख मंजूर असून त्याचे भूमीपूजन झाले व जिल्हा परिषद शाळेत २० लाखाच्या दोन वर्गखोल्याचे लोकार्पण झाले.
सौन्दे येथे भूमीपूजनावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) भारत औताडे, उपसरपंच उमेश वीर यांच्यासह करमाळा येथे ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, माजी नगरसेवक प्रवीण जाधव, राष्ट्रवादीचे अशपाक जमादार, अभिषेक आव्हाड, चंद्रकांत चुंबळकर, सागर गायकवाड, राजेंद्र पवार, सरपंच किरण फुंदे आदी उपस्थित होते.