This proof of identity will be accepted for voting

सोलापूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (7 मे 2024) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदार ओळखपत्र व अन्य 12 पुरावे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत. मतदारांनी मतदार ओळखपत्र बरोबरच छायाचित्र असलेले खालील पुरावे मतदान केंद्रावर दाखवल्यानंतर त्यांना मतदान करता येणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सांगितले आहे.

आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/पोस्ट ऑफीसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेव्दारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम / पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना व आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र तसेच प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मुळ पासपोर्ट (Original Passport) आवश्यक राहील, असे निऱ्हाळी यांनी सांगितले.

    मतदारांच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदार माहिती चिठठी (Voter Information Slip) ग्राहृय असणार नाही, याची मतदारांनी नोंद घ्यावी.अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी  गणेश निऱ्हाळी यांनी दिली.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *