करमाळा : ‘कोणं म्हणतंय देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं..,’ ‘यळकोट यळकोट जय मल्हार..’, ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, अशा घोषणा देत सकल धनगर समाजाच्या वतीने आज (सोमवारी) करमाळा येथील मौलालीमाळ चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले. गजा ढोलने सर्वांचे लक्ष वेधले. प्रशासनाच्या वतीने पोलिस निरीक्षक विनोद घुगे व मंडळ अधिकारी राजेंद्र राऊत यांनी निवेदन स्वीकारले.
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (S.T.) आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धनगर समाजाचे बांधव पंढरपूर व लातूर येथे उपोषण करत आहेत. परंतु सरकारने त्यांची विचारपूसही केली नाही. उपोषणकर्ते यांची प्रकृती गंभीर होत आहे. समाजासाठी आंदोलन करणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नगर- टेंभुर्णी महामार्गावर मौलालीमाळ चौक येथे हा सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांना वाहतूक कोंडीमुळे आंदोलनस्थळी येईला उशीर झाला होता.
Ajitdada उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा करमाळा दौरा ठरला! मंगळवारी ‘वायसीएम’वर आगमन झरे फाट्यावर मेळावा
प्रा. बंडगर यांचे भावनिक आवाहन
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजी बंडगर यांनी समाजाने आरक्षणासाठी एकत्र यावे यासाठी भावनिक आवाहन केले. ‘मराठा समाजाचा सर्वानी आदर्श घेतला पाहिजे. हा समाज मनोज जरांगे यांच्या आवाहनाने एकत्र आला आहे. आरक्षणासाठी तो लढत आहे. धनगर समाज बांधवांनीही आपल्या न्याय हक्कासाठी लढले पाहिजे. तुम्हाल मत कोणाला द्यायचे त्याला द्या, पण समाज म्हणून सर्व एकत्र या’, असे म्हणत त्यांनी भावनिक आवाहन केले आहे. पंढरपुरात आपल्या हक्कासाठी मेळाव्याला एकत्र या, असे ते म्हणाले.
करमाळा बंद! बाईक रॅलीत मराठासह इतर समाजबांधव; महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत जरांगेंना पाठींबा
प्रस्थापित नेते मंडळींकडून फक्त मतांसाठी वापर
बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर म्हणाले, ‘धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा अनेक दिवसांपासूनचा आहे. प्रस्थापित नेते मंडळी आपला फक्त मतांपुरता वापर करत आहे. त्यामुळे आपण आता एकत्र येणे आवश्यक आहे. आपल्या मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या बांधवांकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर आम्ही यापेक्षही तीव्र आंदोलन करू.’ पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब टाकले, नारायण मोटे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक विनोद महानवर यांनी केले तर राहुल चोरमले यांनी आभार मानले.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
मौलालीमाळ येथे धनगर समाज बांधवांच्या रस्ता रोकोवेळी पोलिस निरीक्षक घुगे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. टेंभुर्णी, गुळसडी, करमाळा शहर व नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिस बांधव तैनात होते.
आजोबांनी नोकरी दिली, नातवाचा प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न पण… करमाळ्यातील एसटी बसच्या घटनेने सर्वत्र हळहळ