Fraude de una mujer en nombre del lavado de oro Robo de una tolas y media de oro metiéndose algo en los ojos captado en CCTVFraude de una mujer en nombre del lavado de oro Robo de una tolas y media de oro metiéndose algo en los ojos captado en CCTV

करमाळा शहरात मोहल्ला गल्लीमध्ये एका घरात सोने- चांदी धुण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक करून दीड तोळे सोने घेऊन चोरटा पसार झाला आहे. मात्र हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोने- चांदी धुण्यासाठी सबंधित महिला तयार झाल्यानंतर तिच्याकडील सोने घेऊन हा चोरटा पसार झाल्याची घटना आज (शनिवारी) सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली आहे. सकाळी दहाच्या सुमारास मोहल्ला गल्ली येथे दोन अनोळखी चोरटे मोटरसायकलवर आले. ‘आपण सोने धुवून देत’ असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला चांदी स्वच्छ करून दिल्यानंतर सोने आणा म्हणून सांगितले पाणी गरम करत असताना सदरचे सोने महिलेने त्यांच्याकडे दिले. यावेळी महिलेच्या डोळ्यात काहीतरी टाकून चोरटे पसार झाले. यावेळी आसपासच्या सीसीटीव्हीत तपासणी केली असता दोन संशयित चोरटे एका सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *