करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बोरगाव येथे प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये 50 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रहारचे युवक उपप्रमुख पप्पू ढवळे, अतुल शिंदे, नाना भोगल, जयसिंग घाडगे, दशरथ घाडगे, अनिल शिंदे, आण्णा ननवरे, विजय पाटील, प्रमोद नगरे, अक्षय घाडगे, रवींद्र ढवळे यांनी परिश्रम घेतले. तसेच कमलाई रक्त पिढीला आमंत्रित केले होते.
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि हे कोणत्या कंपनीत तयार होत नाही. जेव्हा रुग्णांना रक्ताची गरज भासत असते तेव्हा हेच रक्त कामी येत आणि रुग्णाचा जीव वाचतो. बच्चू कडू यांची ओळख रुग्णसेवेमुळे तयार झाली. आतापर्यंत त्यांनी 18 लाख रुग्णांना मोफत उपचार केले आहेत.