करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सवाडीत पहिला कॉर्नर सभा होत आहे. या सभेसाठी सावडीसह केत्तूर, कोंढारचिंचोली, कोर्टी, हिंगणी, देलवडी, पारेवाडी, दिवेगव्हाण आदी ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत. आमदार संजयमामा शिंदे, बागल गट, जगताप गटासह महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), रासप, रयत क्रांती व आरपीआय (ए) पदाधिकारी उपस्थित आहेत.
खासदार निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सुरु असलेल्या बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे ऍड. अजित विघ्ने यांनी केले. आमदार संजयमामा शिंदे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुकाध्यक्ष रामा ढाणे, सतीश शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, ऍड. नितिनराजे राजेभोसले, प्रियांका गायकवाड, अर्जुन गाडे, बाळासाहेब टकले, माजी उपसभापती लालासाहेब पाटील, सूर्यकांत पाटील, जालींदर पानसरे, ऍड. अशोक गिरंजे, नीळकंठ अभंग, सुजित बागल, बबनराव मुरूमकर, डॉ. अभिजित मुरूमकर, अपसर जाधव, अशोक पाटील, बाळासाहेब कुंभार, विवेक येवले, किरण फुंदे, संतोष वाघमोडे, संतोष वारगड, सुभाष अभन्ग, जगदीश अगरवाल, दीपक चव्हाण, ऍड. सुमित गिरंजे, आशिष गायकवाड, शंकर कवडे, डॉ. गोरख गुळवे, सुहास गलांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, तालुका प्रमुख राहुल कानगुडे, नवनाथ गुंड, सरपंच तानाजी झोळ, संजय शिलवंत, अमोल पवार, संतोष कुलकर्णी आदी उपस्थित आहेत. सूत्रसंचालन सुजित बागल यांनी केले.
- लक्ष्मण जाधव : पश्चिम भागाचा विकास करण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लीड दिला जाणार
- संतोष वारगड : निंबाळकर खासदार केंद्रात रेल्वे मंत्री होतील
- प्रियांका गायकवाड : गेल्यावेळी लहान बाळ असताना त्याला बरोबर घेऊन निंबाळकरांचा प्रचार केला
- महेश चिवटे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. माजी आमदार नारायण पाटील यांचे नाव न घेता जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरून टीका, शरद पवार यांच्या सभेला यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे गर्दी होणार नसल्याने ठिकाण बदलावे लागले, असे म्हणत महाविकास आघाडीवर टीका
- सुहास गलांडे : विकासासाठी निंबाळकरांच्या मागे उभा राहणे ही गरज, मोदी पुन्हा पंतप्रधान होतील
- ऍड. अजित विघ्ने : निंबाळकरांनी पारेवाडी स्थानकावर रेल्वे थांबा दिला. त्यांनी व मामांनी तालुक्याचा विकास केला. सोशल मीडियावरील चर्चांकडे दुर्लक्ष करा
- विवेक येवले : निंबाळकर निश्चित खासदार होतील, मामांच्या माध्यमातून तालुक्यातून लीड मिळणार
- सूर्यकांत पाटील : डिकसळ पुलाचे काम आमदार शिंदे यांनी केले. पारेवाडीला खासदार निंबाळकर यांनी रेल्वेला थांबा दिला
- आमदार संजयमामा शिंदे : खासदार निंबाळकर यांनी केंद्रातील योजना आणण्यासाठी काम केले आहे. तालुक्याचे अनेक महत्वाचे विषय होते, ते सोडवण्यासाठी मीही प्रयत्न केला आहे.
- खासदार निंबाळकर : निवडणुका आल्याकी आरक्षणचा मुद्दा येतो. मोदींमुळे कोरोना लस मोफत मिळाली. शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मिळाले. मोहिते कुटुंबाचा सर्वाना अनुभव आलेला आहे. आम्हीही त्यांचा अनुभव घेतला आहे. आदिनाथ कारखाना त्यांच्याकडे चालवायला होता. सहकारी संस्थांची अवस्था त्यांनी काय केली हे सर्वांना माहित आहे. स्वतःचा पाप लपवण्यासाठी ते निवडणुकीत आले आहेत. चुकीच्या लोकांना पाठींबा देऊ नका, असे म्हणत त्यांनी कमळाला मतदान करण्याचे आवाहन केले.