Mohite Patal candidacy challenges Nimbalkar The effect of Madha will also be seen in Solapur

करमाळा (अशोक मुरूमकर) : मोहिते पाटील कुटुंबाचा सर्वांना अनुभव आलेला आहे. आम्हीही त्यांचा अनुभव घेतला आहे. आदिनाथ कारखाना त्यांच्याकडे चालवायला होता. सहकारी संस्थांची अवस्था त्यांनी काय केली हे सर्वांना माहित आहे, असे म्हणत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर थेट टीकास्त्र सोडले आहे. स्वतःचे पाप लपवण्यासाठी ते निवडणुकीत आले आहेत. चुकीच्या लोकांना पाठींबा देऊ नका, असे म्हणत त्यांनी कमळाला मतदान करण्याचे आवाहन केले.

माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज (सोमवारी) सावडीत पहिला कॉर्नर सभा झाली आहे. या सभेसाठी सावडीसह केत्तूर, कोंढारचिंचोली, कोर्टी, हिंगणी, देलवडी, पारेवाडी, दिवेगव्हाण आदी ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत. आमदार संजयमामा शिंदे, बागल गट, जगताप गटासह महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), रासप, रयत क्रांती व आरपीआय (ए) पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार निंबाळकर म्हणाले, निवडणुका आल्याकी आरक्षणचा मुद्दा येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे कोरोना लस मोफत मिळाली. शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मिळाले. मोहिते कुटुंबाचा सर्वाना अनुभव आलेला आहे. आम्हीही त्यांचा अनुभव घेतला आहे. आदिनाथ कारखाना त्यांच्याकडे चालवायला होता. सहकारी संस्थांची अवस्था त्यांनी काय केली हे सर्वांना माहित आहे. स्वतःचा पाप लपवण्यासाठी ते निवडणुकीत आले आहेत. चुकीच्या लोकांना पाठींबा देऊ नका, असे म्हणत त्यांनी कमळाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आमदार शिंदे म्हणाले, ‘खासदार निंबाळकर यांनी केंद्रातील योजना आणण्यासाठी काम केले आहे. तालुक्याचे अनेक महत्वाचे विषय होते, ते सोडवण्यासाठी मीही प्रयत्न केला आहे.’ पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले, प्रकल्पातील भूसंपादनाचे पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ते मिळाले आहेत. तालुक्यातील विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत. पर्यटन, समाज कल्याण विभाग, क्रीडा व कृषी भागातून आपल्याला निधी मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून जातेगाव- टेंभुर्णी या महामार्गाचे काम आपण मार्गी लावले आहे, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *