Apply for 15 days Poultry Training on behalf of Animal Husbandry DepartmentApply for 15 days Poultry Training on behalf of Animal Husbandry Department

सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत ,त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यााऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध उपाय व उपक्रमांव्दारे ग्रामिण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतीमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.

विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामिण भागातील पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाच्या वतीने वैयक्तीक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपुर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी‍ निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. आता या बरोबरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजने करीता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी पुढील पाच वर्षापर्यंत म्हणजे 2025-26 लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामूळे अर्ज केलेल्या पशु पालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून , त्यांना प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केंव्हा लाभ मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरीता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

त्यानुसार नाविन्यपुर्ण राज्यस्तरिय व जिल्हास्तरीय योजनांतर्गत दुधाळ गायी म्हशींचे वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे,1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपणासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 आधिक 3 तलंगा वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2023-24 या वर्षात राबविली जाणार आहे. पशु पालाकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड कण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशु पालक /शेतकरी बांधव , सुशिक्षित बेरोजगार युवक/ युवती व महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ-http://ah.mahabms.com.

अँड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव –AH-MAHABMS ( गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध )
अर्ज करण्याचा कालावधी -09 नोव्हेंबर 2023 ते 08 डिसेंबर 2023
टोल फ्री क्रमांक – 1962 किंवा 1800-233-0418

योजनांची संपुर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपुर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील . या संगणक प्रणाली मध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असुन अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांश माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशु पालकांनी अर्ज भरण्याकरीता स्वत:चे मोंबाईलचा जास्तीजास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) , पंचायत समिती , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, जिल्हा पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय, तालुका लघु पशुवैद्यकिय सर्वचिकात्सालय अथवा नजिकच्या पशुवैद्यकिय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन. एल. नरळे यांनी दिली आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *