करमाळा (सोलापूर) : जुनी भाजी मंडई परिसरात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘विश्वकर्मा योजनेचा नोंदणी मेळावा’ घेण्यात आला. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मेळाव्याची सुरुवात झाली. यामध्ये 303 लाभार्थ्यांनी नोंद केली असून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
जगताप म्हणाले, ‘विश्वकर्मा योजनेचा तालुक्यात प्रसार झाला पाहिजे. त्याचा लाभ सर्व कुशल हात मजूर कामगारांनी घेतला पाहिजे, त्यात काही अडचणी आल्यास थेट संपर्क साधावा,’ असे आवाहन त्यांनी केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन यांनी विश्वकर्मा योजनाबद्दल माहिती सांगितली. विश्वकर्मा ही लहू उद्योग करणाऱ्या छोट्या छोट्या कलाकारांना लाभदायक आहे योजना आहे. याचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा उपाध्यक्ष पवार म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विश्वकर्मा योजना राबवली आहे. त्याचा कुशल कामगारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. यासाठी लाभार्थ्यांना एक लाख रुपये पाच टक्के व्याजदराने मिळणार आहेत. तसेच पंधरा हजार रुपये कुशल कामगारांचे अवजारे घेण्यासाठी मिळणार आहेत. यामध्ये लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उपस्थितांचे आभार नरेंद्र ठाकूर यांनी मानले. यावेळी भाजपचे बाळासाहेब कुंभार, रघुनाथ सावंत, युवराज तरंगे, गणेश तळेकर, बापू तळेकर, सचिन चव्हाण, चंपावती कांबळे, भाजपा महिला मोर्चा आघाडी शहराध्यक्ष संगीता नष्टे, सोशल मीडियाचे नितीन कांबळे, अभंग कुंभार, कपिल मंडलिक, संतोष कांबळे उपस्थित होते.