करमाळा (सोलापूर) : जातेगाव- करमाळा- टेंभुर्णी या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. या रस्त्याच्या कामासाठी पैसे मंजूर असून देखील संबंधित अधिकाऱ्यांनी काम केले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर रयत क्रांती संघटना आंदोलन करेल, असा इशारा रयत क्रांतीने दिला आहे. हे निवेदन देतेवेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत थोरात, रयत क्रांतीचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख राजकुमार सरडे, जिल्हाध्यक्ष संतोष वारगड, शिवशंकर जगदाळे, अजय बागल, राजेंद्र ननवरे, संतोष निंबाळकर उपस्थित होते.
