सोलापूर : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत पुणे विभागात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वंयसेवी संस्थामध्ये काळजी व संरक्षणाखाली दाखल असलेल्या अनाथ, निराधार, उन्मी मुलांमधिल सुप्त गुणांना वाव देवुन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी विभागीय स्तरावरील ‘चाचा नेहरु बालमहोत्सव’ सोलापुर येथे आयोजित केला आहे.
या अनुषंगाने चाचा नेहरु बालमहोत्सवानिमित्त विभागीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सोलापुर जिल्ह्यामध्ये करण्यात येणार असुन सदर बालमहोत्सवामध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर या जिल्ह्यातील शासकीय /स्वंयसेवी संस्थामध्ये काळजी व संरक्षणाखाली दाखल असलेल्या अनाथ, निराधार, उन्मर्गी मुले-मुली यांचा सांघिक व वैयक्तीक खेळामध्ये समावेश असुन विविध स्पर्धाचे आयोजन स्नेहालय बालगृह, कारंबा, सोलापुर बार्शी रोड, सोलापुर येथे करण्यात आले आहे. तरी या बाल महोत्सवात जास्तीत जास्त बालक व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले आहे.