Changes in traffic routes in and around Pandharpur city during Kartikiwari periodChanges in traffic routes in and around Pandharpur city during Kartikiwari period

सोलापूर : उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपुर विभाग, पंढरपुर यांनी 30 ऑक्टोबर 2023 अन्वये श्री क्षेत्र पंढरपुर येथे कार्तिक शुध्द पंचमी 18 नोव्हेंबर 2023 ते कार्तिक शुद्ध पोर्णिमा 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कार्तिकी यात्रा भरणार आहे. या यात्रा कालावधीत पंढरपुर शहर व पंढरपुर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवु नये म्हणुन शहरातील महत्वाचे रस्त्यावर पंढरपूर शहरात प्रवेश करणा-या वाहनांबाबत, शहरातून बाहेर जाणा-या वाहतुकीबाबत, पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत, पार्किंग व्यवस्था, एकेरी मार्ग याबाबत नियोजन करणे गरजेचे असल्याने

महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये 21 नोव्हेंबर 2023 रोजी 00.01 ते 27 नोव्हेंबर 2023 रोजी 24.00 वाजे पर्यत पंढरपुर शहर व पंढरपुर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवु नये म्हणुन पंढरपूर शहरात प्रवेश करणा-या वाहनांबाबत, शहरातून बाहेर जाणा-या वाहतुकीबाबत, पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतुक अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण शिरीष सरदेशपांडे यांनी खालील प्रमाणे आदेश दिले आहेत.

(अ) पंढरपूर शहरात प्रवेश करणा-या वाहनांबाबत : अहमदनगर, बार्शी, सोलापूर, मोहोळ कडून येणारी सर्व प्रकारची वाहने करकंब कॉस रोड (अहिल्यादेवी चौक) : तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्किंग करतील, तसेच 65 एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्किंग करतील. पुणे, सातारा, वाखरीमार्गे येणारी वाहने वेअर हाउस व इसबावी विसावा येथील मैदानात पार्किंग करतील.

कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाउस मध्ये पार्कींग करतील. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाउस मध्ये पार्किंग करतील. विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाउस मध्ये पार्किग करतील व बिडारी बंगला व यमाई तुकाई मंदिर मैदान येथे पार्किंग करतील.

(ब) शहरातून बाहेर जाणा-या वाहतूकीबाबत : टेंभूर्णी, अहमदनगर, सोलापूर, लातूर कडे जाणा-या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, करकंब चौक या मार्गाने जातील.

पुणे, सातारा कडे जाणा-या सर्व गाड्या सरगम चौक, कॉलेज क्रॉस रोड वाखरी मार्गे जातील. विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढाकडे जाणा-या सर्व गाडया या सावरकर चौक, नवीन कराड नाका, टाकळी बायपास मार्गे जातील.

क) पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतूकीबाबत : 21 नोव्हेंबर 2023 ते 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनास बंद करण्यात येत आहे.- महाव्दार चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे. सावरकर चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे.

बार्शी, सोलापूर या मार्गावरून तीन रस्ता मार्गे येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पंटागणात उतरतील. ५) नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एस. टी. बसेस यांना जुना दगडीपूल, तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येत आहे.

मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने शहरात सर्व प्रकारचे वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पंटागण ते अर्बन बँक, सावरकर चौक ते अर्बन बँक, लहुजी वस्ताद चौक ते काळा मारुती चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनास बंद करण्यात येत आहे.

(इ) पार्किंग व्यवस्था : अहमदनगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी सर्व प्रकारची वाहने करकंब क्रॉस रोड (अहिल्या चौक), तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्किंग करतील. तसेच नगरपालिकेच्या वाहनतळावर पार्किंग करतील. पुणे, सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा येथे पार्कींग करतील,

कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने ही वेअर हाउस मध्ये पार्कींग करतील. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने ही कासेगांव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाऊस मध्ये पार्किंग करतील. विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने ही कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाऊस मध्ये पार्किंग करतील. व बिडारी बंगला व यमाई तुकाई मंदिर मैदान येथे पार्किंग करतील.

यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण येथे व तसेच संबंधीत मठामध्ये पार्क होतील.
शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाडया पार्किंग होणार नाहीत.

(इ) एकेरी मार्ग : कॉलेज क्रॉस रोड ते सरगम चौक ते सावरकर चौक ते नवीन कराड नाका या मार्गावर एकेरी वाहतुक राहील.

(ई) शहरा बाहेरून जाणा-या वाहतुकीबाबत : पंढरपूर शहर बाहय मार्गावरून जाणा-या जड-अवजड वाहतुकीच्या वाहतुक नियमनाबाबत स्वतंत्र जाहिरनामा निर्गमित करण्यात येत आहे. तरी सदरचे आदेश दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी 00.01 ते 27 नोव्हेंबर 2023 रोजी 24 .00 वाजता पर्यंत अंमलात राहतील असेही आदेशात नमूद केलेले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *