करमाळा तालुक्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून सोलापूर जिल्ह्यात 31 डिसेंबरपर्यंत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविला जात आहे. करमाळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी केले आहे.

डॉ. कदम म्हणाले, ‘या अभियानामध्ये सुशासन युक्त पंचायत म्हणजे लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन तयार करणे, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजिविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे असे अभियान यामध्ये राबविण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवावा’.

पुढे बोलताना डॉ. कदम म्हणाले, ‘करमाळा पंचायत समिती अंतर्गत हा अभियान यशस्वी करण्यासाठी तालुक्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. या अभियानासाठी पंचायत समितीस्तरावरून 36 नोडल अधिकारी नियुक्ती करण्यात आले आहेत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *