करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील दिवेगव्हाणचे श्रद्धास्थान असलेल्या शिवमारुती मंदीर रस्त्याचे काम आमदार संजयमामा शिंदे यांच्या निधीतून पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पारेवाडी रस्ता ते शिवमारुती मंदीर रस्त्याचे काम 25.15 अंतर्गत झाले आहे.
दिवेगव्हाण येथील शिवमारुती मंदिर हे राजुरी, सावडी व दिवेगव्हाण येथील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. येथे रस्ता नसल्याने भाविकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. हे काम पूर्ण व्हावे यासाठी आमदार शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. या कामासाठी सरपंच माधुरी खाटमोडे, उपसरपंच सविता शिंदे, ग्रामसेवक श्री. शेरे यांच्यासह सदस्यांनी योगदान दिले आहे, असे हनुमंत खाटमोडे यांनी सांगितले आहे.
शिवमारुती मंदिर हे जागृत देवस्थान मानले जात असून येथे अनेक भक्त दर्शनाला येतात. दर पौर्णिमेला कीर्तन, प्रवचन व महाप्रसादाचे येथे वाटप केले जात आहे. रस्ता नसल्यामुळे भाविकांना धार्मिक कार्यक्रमासाठी टाळ, पखवाज व महाप्रसादाचे साहित्य डोक्यावर न्याव लागत होते. भक्तांसह या रस्त्यामुळे कुंभारगाव, सावडी, राजुरी, दिवेगव्हाण या गावांना फायदा होणार असल्याचे खाटमोडे यांनी सांगितले आहे.