करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये प्रवेश घेतलेल्या ११ वीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील ५० टक्के ऑनलाईन प्रवेश निश्चित झाले आसून आजपासून (शुक्रवार) नियमित महाविद्यालय सुरु झाले आहे.
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या सूचनेनुसार अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे प्राचार्य संभाजी किर्दाक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महाविद्यालयातील तिन्ही शाखेतील प्राध्यापक उपस्थित होते. बारावीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात मुलांचे स्वागत केले.