करमाळा (सोलापूर) : जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी नुकतीच आषाढी एकादशीच्या निमित्ताने करमाळा तालुक्यात भेट दिली आहे. त्यांनी श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी स्थळाची कंदर येथे पहाणी केली. पालखी सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी नियोजन कसे केले आहे याचाही त्यांनी आढावा घेतला.
वारकऱ्यांसाठी पाणीपुरवठा, राहण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह व आरोग्य सुविधा यासह विविध तयारीचा आढावा त्यांनी घेतला. ज्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या तत्काळ उपलब्ध करून द्या, असे यावेळी त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रभारी प्रांतअधिकारी माळी, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, अण्णासाहेब पवार, सरपंच मौलासाहेब मुलानी, उपसरपंच सचिन शिंदे, ग्राममहसूल अधिकारी ढोकणे, सहाय्यक कृषी अधिकारी महाडिक, ग्रामविकास अधिकारी कळसाईत आदी उपस्थित होते. कंदरमध्ये निवृत्ती महाराज यांची पालखी येते तेव्हा कीर्तन, अभंग असे धार्मिक कार्यक्रम होतात. येथे तामेबंद परिवाराच्या घोड्यांना विशेष आदर दिला जातो.