करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती व अशोका फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा करणे व पालकांवर येणारा खर्चाचा बोजा कमी व्हावा म्हणून दरवर्षी अभियंता संजय रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे हा उपक्रम राबवण्यात येतो. यावेळी पत्रकार आण्णा काळे, आदीनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक हरिदास केवारे, बिभीषण खरात, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब रोडे, कृषी सहायक दादासाहेब नवले, पोलिस पाटील विश्वंभर रोडे, सुभाष रोडे, नवनाथ भालेराव, युवराज गपाट, शशिकांत घोडके, महादेव गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गापाट, विनोद नवले, मछिंद्र रोडे, लालासाहेब काळे, अण्णासाहेब रोडे, अशोक रोडे, राजेंद्र रोडे, शरद रोडे, महादेव रोडे, सोमनाथ रोडे, दत्तात्रय झाम्बरे, दत्ता काळे, लक्ष्मण वाघमोडे, प्रकाश पवार, दत्ता टेबाळे, अजिनाथ भालेराव, संतोष भालेराव, दिगंबर रोडे, सूरज शिंदे, लहू चव्हाण आदी उपस्थित होते.