करमाळा (अशोक मुरुमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबात लाभार्थींना अर्ज दाखल करण्यासाठी करमाळा तहसील कार्यालय परिसरात मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. याचे उद्घाटन आज (सोमवारी) तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका कृषीअधिकारी संजय वाकडे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष भारत आवताडे, डॉ. विकास वीर, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, गुळसडीचे दत्तात्रय अडसुळ, तुषार शिंदे, अशिष गायकवाड, सरपंच रविंद्र वळेकर, आमदार शिंदे यांचे समर्थक भोजराज सुरवसे, देवा लोंढे, हरीकाका वळेकर, ब्रह्मदेव राख, आदिनाथ मोरे, आळजापूरचे युवराज गपाट, राष्ट्रवादीचे अश्पाक जमादार, अभिषेक आव्हाड, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शितल क्षिरसागर, तालुका उपाध्यक्ष स्नेहल अवचर, रुपाली अंधारे, नंदीनी लुंगारे, पल्लवी रनशुंगारे आदी उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ हि सरकारने काही दिवसांपूर्वी घोषणा केलेली योजना आहे. यामध्ये लाभार्थी महिलेला महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. हा अर्ज दाखल करताना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करता यावी म्हणून तहसीलच्या परिसरातच हा मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.

आमदार शिंदे यांच्या संपर्क कार्यालयातून सुरुवातीपासून महिलांना अर्ज भरण्यासाठी मदत करा अशा सुचना गावागावातील कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. निंभोरे येथे याबाबत सरपंच वळेकर यांच्या माध्यमातुन ५२५ अर्ज दाखल झाले आहेत. वीट व लिंबेवाडी येथेही याबाबत जागृती करण्यात आली होती. बिटरगाव श्री येथे घरोघरी महिलांना अर्ज देण्यात आले होते. आता याची व्याप्ती लक्षात घेऊन तहसीलच्या आवारात मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *