करमाळ्यातील कमलाभवानी मातेच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात

nvrtatotsav kaysangtaa karmala news kay sangta marathi news kamlabhvani news

करमाळा (सोलापूर) : करमाळ्याचे आराध्य दैवत कमलाभवानी मातेच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात आज (गुरुवार) सकाळी ८ वाजता मंदिर समितीचे सदस्य राजेंद्र वाशिंबेकर व त्यांच्या पत्नी या दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत घटस्थापनेने झाली. यावेळी सर्व पंचायतन देवस्थानमध्ये घटस्थापना करण्यात आली. यावेळी आई कमलाभवानी मातेचा महाअभिषेक करण्यात आला. सुशील पुराणिक, रविराज पुराणिक यांनी पौराहित्य केले. यावेळी आई कमलाभवानी मातेला गुलाबी रंगाचा भरदारी शालू, दागिने ,आकर्षक हार व फुले घालून मंदिराचे पुजारी दादासाहेब पुजारी यांनी पूजा मांडली. सनई चौघडे, झांज, नगारा, संबळाच्या तालावर देवीची आरती झाली. यावेळी बापूराव पुजारी, विजय पुजारी, ओंकार पुजारी, संदीप पुजारी, सचिन सोरटे, तुषार सोरटे, किसन सोरटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *