करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या हस्ते झाले. बाजार समिती इमारतीसमोरील देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष ॲड. कमलाकर वीर व बाजार समितीचे संचालक मनोज पितळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
खरेदी विक्री संघाचे संचालक हनुमंत ढेरे, बाजार समितीचे माजी संचालक मयूर जोशी, माजी सचिव दत्तात्रेय क्षिरसागर, सचिव विठ्ठल क्षिरसागर, सहाय्यक सचिव रविंद्र उकिरडे, व्यापारी प्रीतम लुंकड, राजेंद्र चिवटे, तालुका गटसचिव पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल सुरवसे, जिल्हा बँकेचे बँक इन्स्पेक्टर नगरे यांच्यासह व्यापारी, कर्मचारी, शेतकरी, गटसचिव आदी उपस्थित होते.