Commuters are relieved as the Coimbatore Kurla train halts for a day at JeurCommuters are relieved as the Coimbatore Kurla train halts for a day at Jeur

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या जेऊर स्थानकावर रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नातून कोईमतूर- कुर्ला रेल्वे गाडीला एक दिवसासाठी थांबा मिळाला त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार व प्रवाशांची सोय झाली. जेऊर येथील रेल्वे स्टेशनवरून दररोज पुणे येथे शिक्षण, नोकरी व दैनंदिन कामकाजासाठी हैद्राबाद- मुंबई एक्सप्रेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. 13 सप्टेंबरला सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी येणारी हैदराबाद- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस उशिराने धावत असल्याने या गाडीने नेहमी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. अचानक गाडी लेट असल्याचे कळल्याने पुण्याला परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फारच गैरसोय होणार होती. आरोग्य उपचारासाठी पुणे येथे हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट असणारे काही रुग्ण या गाडीने जाणार होते, अशावेळी जाणाऱ्या प्रवासातील काही प्रवाशांनी जेऊर येथील प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला व ही अडचण त्यांना सांगितली.

प्रवासी संघटनेचे सुहास सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून एका दिवसासाठी कुर्ला कोईमतुर या गाडीला जेऊर स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन जेऊर रेल्वे स्टेशन प्रबंधक व प्रशासनाने ही सकारात्मक पाऊल उचलत कुर्ला कोईमतुर गाडीला जेऊर येथे थांबवले. या काळात सर्व प्रवाशांना या गाडीने प्रवास करणे शक्य झाले. याबद्दल प्रवासी संघटनेचे व या कामी सहकार्य करणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे सर्व प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांनी आभार मानले.

जेऊर स्टेशनवरून काही विद्यार्थी परीक्षेला पुणे येथे चालले होते. काही नोकरदार वर्गाला त्यांना कामावर वेळेवर जायचे होते. काही प्रवासी दवाखान्यात चालले होते. आशा प्रवाशांना या थांब्यामुळे मोठा दिलासा मिळाला. वारंवार अशा अडचणी या स्टेशनवर येत असल्याने हुतात्मा एक्सप्रेस ला कायमस्वरूपी या स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी अनेक दिवसापासून रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने केली जात आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *