Grand Motorcycle Rally from Karmala to Chaundi on Sunday on behalf of Sakal Dhangar SamajGrand Motorcycle Rally from Karmala to Chaundi on Sunday on behalf of Sakal Dhangar Samaj

करमाळा (सोलापूर) : एस. टी. धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी व चौंडी येथे यशवंत सेनेचे समाज बांधव आठ दिवसांपासून अमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी त्याची दखल घेतली नाही. उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसांदिवस ढासळत असून प्रशासन समाज बांधवांच्या जिवाशी खेळत आहेत. त्या निषेधार्थ सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या वतीने रविवारी (ता. १७) जेऊर बाजारतळ येथून सकाळी ९ वाजता तर दत्त मंदिर काॅटेज येथून सकाळी ९:३० वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ होणार आहे.

चौंडी येथे जाऊन करमाळा तालुक्याच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध पत्राद्वारे म्हटले आहे. चोंडी येथे धनगर आरक्षण अमलबजावणीसाठी उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना जाहीर पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातून शनिवारऐवजी रविवारी सकाळी ९:३० वाजता दत्त मंदीर करमाळा येथून भव्य मोटारसायकल रॅली निघणार आहे. सकल धनगर समाजाच्या वतीने करमाळा ते चौंडी भव्य मोटारसायकल रॅली काढून या सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थितीत राहाण्याचे आव्हान सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *