अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तत्काळ विरोधी पक्षनेता आणि प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांची घोषणा केली. मात्र आता काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे.
काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, ज्याचे ज्यास्त आमदार त्याचाच विरोधी पक्षनेता असणार आहे. पुढे बोलताना थोरात म्हणाले, महाविकास आघाडी या प्रकारामुळे डगमगणार नाही. उलट या प्रकारामुळे वज्रमूठ आणखी भक्कम होणार आहे.