करमाळा (अशोक मुरूमकर) : अजित पवार यांच्या शिंदे व फडणवीस सरकारमधील सहभागामुळे तालुक्यातील विकास कामांचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी जोरदार चर्चा आमदार संजयमामा शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये सुरु झाली आहे. आमदार शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना पवार यांच्या माध्यमातून अनेक कामे मंजूर करून घेतली होती. मात्र शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर त्यातील अनेक कामांना स्थगिती आली होती. आता पवार हेच पुन्हा उपमुख्यमंत्री झाले असल्याने स्थिगिती हटवून विकास कामे होतील, असा अंदाज लावला जाऊ लागला आहे.
आमदार शिंदे गटाचे समर्थक सुजित बागल यांच्या म्हणण्यानुसार आमदार शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यात मांगी तलावात कुकडीचे पाणी, रस्ते, एमआयडीसी, उपसासिंचन योजना, आरोग्य, वीज अशी अनेक महत्वाची कामे केली जात आहेत. मात्र शिंदे- फडणवीस सरकार आले तेव्हा काही कामांवर स्थगिती आली होती. मात्र आता अजित पवार हेच या सरकारमध्ये सहभागी झाले असून त्यांच्याच काळात मंजूर झालेली विकास कामे करून घेण्यात आमदार शिंदे यांना यश येणार आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने हे अतिशय चांगले आहे.
करमाळ्याचे अपक्ष आमदार संयजमामा शिंदे यांनी अद्याप जाहीरपणे भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र ते उपमुख्यमंत्री पवार यांच्याबरोबरच जातील, असा अंदाज आहे. ते पहिल्यापासून अजितदादा पवार यांना नेते मानतात. त्यामुळे त्यांची भूमिका काय असू शकते याचा अंदाज सर्वांना आहे. आमदार शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार असताना अनेक कामांना मंजुरी आणली होती.
ही आहेत स्थगित कामे