करमाळा (सोलापूर) : चिखलठाणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील (आबा) व स्व. दिगंबरराव बागल (मामा) पुरस्कृत श्री. कोटलिंग जोगुबाई ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन आज (गुरुवारी) प्रचार सभेत करण्यात आले.
चिखलठाण येथील खंडोबा मंदिरासमोर श्री. कोटलिंग जोगुबाई ग्रामविकास पॅनलची सभा झाली. गावातील प्रमुख मार्गाने पदयात्राकाढून ही जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी पॅनलचे चिन्ह असलेले नारळ, ट्रॅक्टर, टॅक्सी व रिक्षा यांचाही सहभाग होता. या सभेवेळी सरपंच पदाच्या उमेदवार धनश्री गलांडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवार मनीषा जाडकर, आंनदा पोळ, योगेश सरडे, होजराबाई सरडे, सुनीता गव्हाणे, धीरज सरडे, प्रतीक्षा कळसाईत, पुष्पा चव्हाण, अक्षयकुमार सरडे, हेमंत बारकुंड, संभाजी कांबळे, सुमन गव्हाणे, राजाबाई मारकड उपस्थित होते.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, मकाईचे संचालक दिनकर सरडे, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, आदीनाथचे माजी उपाध्यक्ष केरु गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते समाधान गव्हाणे, माजी सरपंच सुखदेव नेमाने, मकाईचे माजी संचालक महादेव सरडे, सोसायटीचे संचालक रविंद्र पोळ, रंगनाथ पवार, साहेबराव मारकड, चंद्रकांत सुरवसे, सोसायटीचे संचालक राहुल गोळे, विजकुमार सुराणा, आदिनाथ सरडे, नितीन पाटील, आदिनाथचे माजी संचालक संदिपान बारकुंड, दत्तात्रय बारकुंड, माजी सरपंच सुदाम चव्हाण, बाजार समठितीचे माजी संचालक बाळासाहेब कोकाटे, चंद्रकांत जाणभरे, मच्छिंद्र सरडे, आत्माराम नेमाने, श्रीनाथ गव्हाणे, सोमनाथ राऊत, किसन पवार, जयराम पवार, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याणच्या माजी सभापती संगिता सरडे आदी मंचावर होते. प्रस्ताविक श्रीपाल गव्हाणे यांनी तर अक्षय सरडे यांनी अनुमोदन दिले.
राजेंद्र बारकुंड, मच्छिंद्र सरडे, आत्माराम नेमाने, जगंनाथ नेमाने, विकास गलांडे, दत्तात्रय सरडे, करू गव्हाणे, दिनकर सरडे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. गावचा विकास करण्यासाठी सरपंचपदाच्या उमेदवार गलांडे यांच्यासह सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सध्या गावचे वारे बदलले असून या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गलांडे सरपंच झाल्या तर संपूर्ण गावाला घरपट्टीत सवलत दिली जाणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे.