Constitution Day mini marathon in Karmala city on SundayConstitution Day mini marathon in Karmala city on Sunday

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान सन्मान दौड अर्थात मिनी मॅरेथॉन स्पर्धा रविवारी (ता. २६) सकाळी साडेसहा वाजता होणार आहे. भिमाई बहुउद्देशिय सामाजिक संस्था व डॉ. आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने जयकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे ही स्पर्धा होणार आहे. या मॅरेथॉनसाठी करमाळा शहर व तालुक्यातून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नाव नोंदणी केली आहे. याचे उद्घाटन बौद्धाचार्य प्रशांत कांबळे व दलित सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी भीम आर्मी (संरद) महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे, माजी नगरसेविका सविता कांबळे, फारुक बेग, आगार व्यवस्थापक होनराव, अमीरशेठ तांबोळी, पार्श्वगायक संदीप शिंदे पाटील, भिमदल सामाजिक संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा होणार आहे.

मिनी मॅरेथॉन खुल्या गटात होणार आहे. यासाठी प्रथम तीन मुलांसाठी व प्रथम तीन मुलींसाठी आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा मुलांची व मुलींची स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ मुलींसाठी १० प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ मुलांसाठी १० प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तरी सदरच्या संविधान सन्मान मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन सनी कांबळे, मंगेश ओहोळ, फिरोज शेख, युसुफ शेख, समीर शेख, सुभाष गोसावी, सागर पवार, शैलेश कांबळे, राजू पवार, गणेश पवार, रवी कांबळे, सिद्धांत कांबळे, संघर्ष कांबळे, राहूल कांबळे, प्रणव जानराव, प्रियांश जानराव, सम्राट सरवदे, सार्थक कांबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *