श्रीराम प्रतिष्ठानकडून करमाळ्यात बांधकाम कामगार नोंदणी शिबीर

Construction labor registration camp at Karmala by Shriram Pratishthan

करमाळा (सोलापूर) : गायकवाड चौक येथे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने बांधकाम कामगार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आज (सोमवारी) उद्घाटन झाले. पाच दिवस शिबीर राणार असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले आहे. सोलापूरचे बांधकाम कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातील अधिकारी सुनील हुकेरी, श्री. गायकवाड अभियंता विश्वासराव काळे, बाळासाहेब बेडकुते, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब काळे, धर्मराज घाडगे, गणेश सरडे, रोहित कोरपे, गोविंद अग्रवाल, निलेश माने आदी यावेळी उपस्थित होते.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, विलास जाधव, विष्णू रणदिवे, आजिनाथ सुरवसे, धर्मराज नाळे, अमोल पवार, नितीन झिंजाडे, विनोद महानवर, जयंत काळे पाटील, सोमनाथ घाडगे, दीपक गायकवाड, किरण शिंदे, भैय्याराज गोसावी, हर्षद गाडे, हरी आवटे, अक्षय हानपुडे, सुनील नेटके, अशोक मोरे, संदीप काळे, नंदु इरकर, बजरंग मोहोळकर, अशोक साळुंखे, श्रीकांत किरवे, संतोष जवकर, शंभुनाथ मेरुकर, शैलेश राजमाने, हर्षल झिंजाडे, भरत गुंड, सुरज लष्कर, हनुमंत फरतडे, शरद कोकीळ, संजय किरवे, विनोद इंदलकर आदीनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *