करमाळा (सोलापूर) : करमाळा – टेंभुर्णी महामार्गावर कंदर येथील सदगुरु मंगल कार्यालयासमोर भरधाव वेगाने आलेल्या एका कंटनेरने मोटरसायकलला धडक दिली आहे. यामध्ये वांगी नंबर 2 येथील ही मोटरसायकल असून त्यावरील दोघेजण जखमी झाले आहेत. गणपत महादेव चौधरी व नवनाथ शिंदे अशी जखमीची नावे आहेत. हे दोघेही जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शनिवारी (ता. 14) दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास झाला आहे.
जखमी चौधरी व शिंदे हे मोटरसायकलने शेवरे येथे नातेवाईकांकडे जात होते. चौधरी हे मोटरसायकल चालवत होते. भरधाव वेगात कंटेनर अचानक त्याच्यासमोर आला आणि त्यांना धडक दिली. त्यात दोघेही खाली पडले. यात त्यांच्या हाताला, पायाला व डोक्याला मार लागला आहे. त्यांना टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. शिंदे हे बेशुद्ध आहेत. टेंभुर्णी येथे प्राथमिक उपचार करून त्यांना सोलापूर येथे एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. चौधरी हे टेंभुर्णी येथे आहेत.
यामध्ये टेंभुर्णीकडून नगरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या अनोळखी कंटेनेर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. निष्काळजीपणे व हाय्गाईने रस्त्याच्या परस्थितीकडे दुर्लक्षकरून वाहन चालवून धडक दिल्याप्रकरणी 20 तारखेला करमाळा पोलिसात हा गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास करमाळा पोलिस करत आहेत.