तरटगाव बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करा; पालकमंत्र्यांना जाधव पाटील यांचे निवेदन

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना त्वरित भरपाई द्यावी यासह तरटगाव बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अजिंक्य जाधव पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे.

करमाळा तालुक्यात सीना नदीला आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. खडकी बंधारा फुटला आहे. सांगोबाच्या बंधाऱ्यावरून पाणी वाहिले. तरटगाव बंधारा थोडक्यात वाचला आहे. त्याच्या बाजूचा रस्ता वाहून गेला आहे. तर पोटेगाव बंधारा नादुरुस्त आहे. याकडे गांभीर्याने पहाण्याची गरज असल्याचे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. करमाळा तालुक्यातील खडकी, आळजापूर, बिटरगाव श्री, पोथरे, निलज, करंजे, बोरगाव, पोटेगाव, बाळेवाडी, तरटगाव आदी गावांना सीना नदीच्या पाण्याचा उपयोग होतो. यावर्षी आलेल्या पुरामुळे या भागातील नदी कटाच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना त्वरित मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, भाजपचे कन्हैयालाल देवी, राष्ट्रवादीचे सुजित बागल, अशपाक जमादार, खडकीचे दादा जाधव, अशोक मुरूमकर, जातेगावचे तुषार शिंदे, जयंत दळवी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *