पुणे : पुणे शहर हरित करून प्रदूषण मुक्त करण्याच्या मोहिमेचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्द्देशाने दाउदी बोहरा समाजाच्या वतीने सैफी बुरहानी एक्सपो 2025 तर्फे ‘गो ग्रीन’ पुणेे रॅली काढण्यात आली. या रॅलीत अब्दली भाईसाब- अमिल साब पुणे, इदरीस भाईसाब, मोइज़ जमाली, हुज़ेफा परदावाला, कुरेश घोडनादिवाला, फखरुद्दीन चोपड़ावाला, हमजा छत्रिस, अब्दुल कादिर सद्भावनासह लहान मुलांपासून तर वृद्धांचा समावेश होता.
गो ग्रीन पुणे रॅलीमध्ये १२ कार आणि 60 बाइक्ससह ग्रीन पुणे कॅम्पेन आणि एक्स्पोचा प्रचार करणारे पोस्टर्स होते. गो ग्रीन पुणे रॅली पुणे कॅम्पपासून झेंडा दाखून सुरुवात झाली. ही रॅली सोलापूर रोड, हडपसर, फातिमानगर, वानवडी, साळुंके विहार, एनआयबीएम, फाखरी हिल्स, एमजी रोड, लक्ष्मी रोड, डेक्कन, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे विद्यापीठ रोड, बंड गार्डन रोड, कल्याणी नगर, विमान नगर, डेक्कन कॉलेज ग्राऊंड मार्गे कॅम्प येथे आली.
सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 तीन वर्षांपासून रॅली काढली जात असून हे चौथे वर्ष आहे. 4 जानेवारीपासून सैफी बुरहानी एक्सपो पुणे २०२५ सुरु होत असून 6 जानेवारीपर्यंत डेक्कन कॉलेज ग्राऊंड येथे चालणार आहे. सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 व हरित पुणे मोहिमचा प्रचार व प्रसार करण्याच्या उ्द्देशाने गो ग्रीन पुणे रॅली काढण्यात आली होती.