करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी मोरवड येथील दादासाहेब कुदळे

Dadasaheb Kudale from Morvad as Taluka President of Karmala Taluka Kisan Congress Committee

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी मोरवड येथील दादासाहेब कुदळे यांची निवड झाली आहे. खासदार हुसेन हलवाई व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या उपस्थितीत अकलूज येथे या निवडीचे पत्र देण्यात आले आहे. करमाळा तालुका ओबीसी सेल तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख, करमाळा तालुका युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप, करमाळा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोक घरबुडे, छगन मोहोळकर, करमाळा तालुका ओबीसी सेलचे उपाध्यक्ष भगवान डोंबाळे, प्रतीक जगताप, अशोक शिंदे, नितीन चोपडे, हर्षद काळे, दिनेश सालगुडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *