दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाणी सुरु

Dahigaon Sub Irrigation Scheme water started

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले. शिंदे गटाचे समर्थक विलास पाटील, आशिष गायकवाड, रविंद्र वळेकर, डॉ. विकास वीर, अण्णा साळुंखे, सूरज ढेरे, अप्पा आरणे, प्रणित शिंदे, दहिगाव योजनेचे उपअभियंता एस. के. अवताडे, श्री. शिंदे, श्री. कांबळे, शेख आदी यावेळी उपस्थित होते. अत्यंत कमी प्रमाणात पाऊस असल्यामुळे केळी व ऊस यांचे नुकसान होऊ लागले होते. पाणी व चारा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे अशात पाणी मिळणे आवश्यक होते. आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हे पाणी सुरु झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *