करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एल. बी. पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईचे (आ) पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी संस्थेच्या अध्यक्षांकडे निवेदन दिले आहे. महाविद्यालयातील कर्मचारी महिलेला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे.
