करमाळा (सोलापूर) : मोरवड- करमाळा एसटी बस वेळेत लागत नसल्याची तक्रार विद्यार्थी व प्रवासी करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याकडे आगार प्रमुखांनी त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. सध्या महाविद्यालयाच्या व शाळांच्या परीक्षा सुरु आहेत. त्यात वेळेवर एसटी बस सुटत नाही. सायंकाळी 5 वाजता सुटणारी एसटी बस उशीरा सुटते व सकाळी येणारी बसही वेळेवर येत नाही, असे प्रवासी सांगत आहेत. अनेकदा नादुरुस्त एसटी बसही मध्येच बंद पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
करमाळा- मोरवड एसटी बस वेळेवर सोडण्याची मागणी
