करमाळा (सोलापूर) : दिवसांदिवस टंचाई वाढत असल्याने तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर, चारा छावण्या त्वरित सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे.
सुपनवर म्हणाले, करमाळा तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सालसे, आळसुंदे, वरकुटे, नेरले, आवाटी, कोळगाव, हिवरे, फिसरे, मिरगव्हाण, भालेवाडी, करंजे, हिसरे, बोरगाव, बाळेवाडी, तरटगाव, पाडळी, घारगाव, वडाचीवाडी, दिलमेश्वर, निलज, पोथरे, खांबेवाडी, धायखिंडी, हिवरवाडी, भोसे, पुनवर, वडगाव, रावगाव, वंजारवाडी, मोरवड, वीट, पिंपळवाडी, रोशेवाडी, झरे, देवळाली, खडकेवाडी, राजुरी, पोधवडी, कोर्टी, हुलगेवाडी, गोरेवाडी, कुंभारगाव, सावडी या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई व चारा टंचाई आहे.
प्रशासनाने टँकर सुरु करून चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी बनकर, आजिनाथ इरकर, गणेश इवरे, दादासाहेब महानवर, समाधान मारकड, निलेश कोकरे, नवनाथ कोळेकर, नितीन तरंगे, संदीप मारकड, धनाजी कोळेकर, किशोर शिंदे, निलेश पडवळे, आजिनाथ शिंदे, अनिल तेली, आबासाहेब तरंगे आदी उपस्थित होते.